TAFNAP NEWS
१४ जुलै २०२३ शुक्रवार https://drive.google.com/file/d/1deUDxHqG63A0EWHTxfdnq8jDAJC6hyME/view?usp=sharing
मित्रानो...
मी काल मुंबईला अॅडव्होकेट सुरेश पाकळे व सुप्रीम कोर्टामधील आपले वकील अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव सरना भेटायला गेलो होतो. ह्या भेटीमध्ये माझी ह्या दोघांशी कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली ह्याची आपल्यापैकी बऱ्याच जणांना उत्सुकता होती, त्यासाठी मला अनेकांनी फोनही केले. प्रत्येकाशी स्वतंत्र बोलण्यापेक्षा ह्या भेटीतले महत्वाचे मुद्दे तुमच्याशी share करतोय.
१. नीरज पाटील, स्मिता वांगीकर व वर्षा साबळे यांच्या स्कूल ट्रॅब्युनल अपील संदर्भात अॅडव्होकेट सौरभ पाकळे व अॅडव्होकेट सुरेश पाकळे यांचेशी सविस्तर चर्चा झाली. ह्या केस संदर्भातील काही कागदपत्र, जाहिराती वै. ब्रिफला जोडल्या. हे मॅटर १० ऑगस्ट रोजी बोर्डावर यायची शक्यता आहे. ह्या चर्चेच्या वेळी स्मिता वांगीकर व वर्षा साबळे मॅडम हजर होत्या.
२. श्रीपती कोरे यांच्या स्कूल ट्रॅब्युनल अपील संदर्भात अॅडव्होकेट सौरभ पाकळे व अॅडव्होकेट सुरेश पाकळे यांचेशी सविस्तर चर्चा झाली. हे मॅटर २६ जुलै रोजी बोर्डावर यायची शक्यता आहे.
३. आपणा सर्वांच्या दृष्टीने महत्वाची केस म्हणजे पॉलिटेक्निकच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व केसेस डायरेक्शनसाठी हायर बेंच (३ जज्ज असणार बेंच) कडे न्या. शुक्रेंच्या आदेशाने रेफर करण्यात आल्या आहेत. न्या. शुक्रेंच्या ह्या आदेशामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पॉलिटेक्निकच्या कर्मचाऱ्यांची मॅटर्स प्रलंबित झालेली आहेत. ह्या संदर्भात अॅडव्होकेट सुरेश पाकळे सरांशी सविस्तर चर्चा झाली. प्रभारी मुख्य न्यायाधीशांनी ३ जज्जचे हायर बेंच स्थापन केले आहे. ह्या बेंचमध्ये न्या. नितीन जामदार (प्रभारी मुख्य न्यायाधीश), न्या. भारती डांगरे व न्या. संदीप मारणे ह्यांचा समावेश आहे. ह्या बेंचसमोर सोमवार दि. १७ जुलै रोजी सुनावणी निश्चित झालेली आहे. ह्या सुनावणीसाठी आपल्या सर्व मॅटर्सचा विनंती अर्ज पाकळे साहेबांनी आजच सादर केला आहे. (सोबत हा अर्ज जोडला आहे). सोमवारच्या सुनावणीत ह्या Dead Lock मधून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल ह्याची पाकळे साहेबांना खात्री आहे. ह्या संदर्भात मी सातत्याने पाकळे साहेबांच्या संपर्कात आहे.
४. माझ्या उपस्थितीमध्ये पाकळे साहेबांशी चर्चा करण्याकरता के.के. वाघ तंत्रनिकेतनचे प्राध्यापक, बारामतीचे प्रा. कुलकर्णी, प्रा. सचिन शिंदे, शहापूरच्या आरमाइट इंजिनिअरींग कॉलेजचे प्रा. राम यादव व प्रा. गोविंद वाघमारे आले होते. ह्या सर्वांच्या मॅटर्स बद्दल थोडक्यात चर्चा झाली. सध्या न्या. पटेल यांचे डिव्हिजन बेंच आहे. ह्या बेंचकडून फार आशादायक निकालांची अपेक्षा नाही त्यामुळे इतर सर्व मॅटर्स हे बेंच बदलल्यानंतर चालवायचे ठरले.
५. आजच्या भेटीत शहापूरच्या आरमाइट इंजिनिअरींग कॉलेजचे प्रा. राम यादव व प्रा. गोविंद वाघमारे यांचेशी सविस्तर चर्चा करता आली. प्रा. गोविंद वाघमारे यांचा व माझा पूर्वीचा परिचय होता पण प्रा. राम यादव यांच्याशी पहिल्यांदाच मुलाखत झाली. मुक्ता शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक डॉ. सुभाष आठवले व डॉ.वैभव नरवडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. राम यादव यांनी खूप मोठा लढा उभा केला आहे. माहिती अधिकाराचा चपखल वापर व आपल्या Use Value पेक्षा Nuisance Value ने मुजोर मॅनेजमेंट व शासकीय अधिकाऱ्यांना कसे वटणीवर आणायचे याचे अनेक किस्से प्रा. राम यादव यांचेकडून ऐकायला मिळाले. ऑगस्ट मधील माझ्या प्रस्तावीत नॉर्थ महाराष्ट्र दौऱ्यात प्रा. राम यादवनी सहभागी व्हावे अशी विनंती मी त्यांना केली आहे. प्रा. राम यादव हे एक वेगळ्या प्रकारचे रसायन आहे आणि टॅफनॅपच्या राज्य अधिवेशनामध्ये ह्या रसायनाचा एक डोस तुम्हा सगळ्यांना अनुभवयाला मिळेल.
६. संध्याकाळी ७.०० वाजता टॅफनॅपचे सुप्रीम कोर्टामधील वकील अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव सरना भेटायला भिवंडी येथे गेलो. जाधव सरांची अर्धा तास भेट झाली. एस.एच.एम. आय.टी. उल्हासनगरच्या क्लोजरच्या मॅटरमध्ये अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी आपल्याला एकहाती विजय मिळवून दिला. त्या बद्दल त्यांचा टॅफनॅपतर्फे सत्कार करून एस.एच.एम. आय.टी. उल्हासनगरच्या स्टाफच्या वतीने कृतज्ञता निधी अर्पण करण्यात आला. केस जिंकल्यानंतर बरेच लोक वकिलांची फी देखील बुडवतात, एस.एच.एम. आय.टी. उल्हासनगरच्या कर्मचाऱ्यांवर टॅफनॅपचे संस्कार असल्यामुळे ६ सप्टेंबर २०१८ साली सुप्रीम कोर्टात ह्या केसचा निकाल लागल्यानंतर जवळपास ५ वर्षांनी एस.एच.एम.आय.टी. उल्हासनगरच्या स्टाफच्या वतीने अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव सरना रु. एक लाख एवढा भरघोस कृतज्ञता निधी अर्पण करून अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव सरांच्या प्रती आमची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सध्या सुप्रीम कोर्टात सुरु असणाऱ्या सतीश मांजरे तसेच त्यासोबत दत्ता मेघे नागपूरच्या इतर मॅटर्स व चोपड्याचे प्रा. भदाने ह्याचे हियरींग लौकरात लौकर घेवून आपण न्याय मिळवायचा प्रयत्न करू असे आश्वासन अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी दिले.
ह्या कार्यक्रमासाठी माझ्या सोबत एस.एच.एम.आय.टी.च्या प्रा. नेहा कोरडे, प्रा. संध्या भावसार, प्रा. राणे, प्रा. सचिन शिंदे, प्रा. राम यादव व प्रा. गोविंद वाघमारे उपस्थित होते.
Comments
Post a Comment