MEPS Act च्या “Schedule C” मध्ये कर्मचाऱ्यांना देय असणाऱ्या वेतनश्रेणी
मित्रानो
(I am reposting my old post for more clarification)
https://drive.google.com/file/d/1wAbax5TvFdm-dpABT5nvuGvuVAQogMXf/view?usp=sharing
Service conditions of Polytechnic teaching and non teaching staff are governed by the provisions of Maharashtra Employees of Private School Act 1977 (MEPS Act in short). ह्या MEPS Act च्या “Schedule C” मध्ये कर्मचाऱ्यांना देय असणाऱ्या वेतनश्रेणीचा उल्लेख असतो. पॉलीटेक्निकच्या प्राध्यापकांच्या पे स्केलचा सध्या MEPS Act च्या “Schedule C” मध्ये उल्लेख नाही. त्या ऐवजी महाराष्ट्र शासनाने वेळोवळी शासकीय आदेश (GR) निर्गमित करून पॉलीटेक्निकच्या प्राध्यापकांची पे स्केल निर्धारित केलेली आहेत.
दि. १४ जून २०२२ रोजी न्या. शुक्रे व न्या. सानप ह्यांच्यासमोर चार वेगवेळ्या मॅटर्सची सुनावणी झाली, ज्या मध्ये पॉलीटेक्निकच्या प्राध्यापकांची दोन मॅटर्स होती. ह्या मॅटर्समधील प्राध्यापक हे टॅफनॅपचे सदस्य आहेत पण त्यांचे वकील अॅड. उदय वारूंजीकर हे होते. अॅड. उदय वारूंजीकर हे काही मॅटर्समध्ये प्राध्यापकांची बाजू मांडतायत तर बऱ्याच मॅटर्समध्ये ते मॅनेजमेंटचे वकील आहेत. एकदा न्या. धर्माधिकारी यांनी भर कोर्टात अॅड. उदय वारूंजीकर यांना वारूंजीकर तुम्ही नेमके प्राध्यापकांच्या बाजूने बोलणार आहात की मॅनेजमेंटच्या असा प्रश्न विचारून अॅड. उदय वारूंजीकर यांना लाजवले होते. वकिली Professionची काही Ethics असतात, वारूंजीकरनी ही सर्व Ethics & Principles न पाळता कायम मॅनेजमेंटच्या फायद्याचीच मांडणी करून त्यांच्याकडे असणाऱ्या प्राध्यापक पिटीशनर्सचे खूप नुकसान केले आहे.
दि. १४ जून २०२२ रोजीच्या सुनावणीमध्ये अॅड. अंतुरकर (Sr. Councilor) हे एका मॅनेजमेंटचे वकील होते. त्यांनी असा मुद्दा मांडला की MEPS Act च्या “Schedule C” मध्ये Amendment करून जो पर्यंत पॉलीटेक्निकच्या प्राध्यापकांना देय असणाऱ्या पे स्केलचा उल्लेख केला जात नाही तो पर्यंत पॉलीटेक्निकच्या प्राध्यापकांची वेतन निश्चिती करता येणार नाही. वास्तविक पाहता MEPS Act च्या “Schedule C” मध्ये अशा प्रकारची Amendment झालेली आहे आणि जर कायद्यात पे स्केलचा उल्लेख नसेल तर राज्य शासनाला अशी पे स्केल्स जी.आर. काढून निर्धारित करता येतात अशी भारताच्या राज्य घटनेत तरतूद आहे. तथापी काही अर्थपूर्ण संबंधामुळे अॅड. उदय वारूंजीकर यांनी हे मुद्दे कोर्टासमोर मांडलेच नाही आणि त्यामुळे न्या. शुक्रे व न्या. सानप यांनी दि. १४ जून २०२२ रोजी अशी ऑर्डर पास केली की पॉलीटेक्निकच्या प्राध्यापकांच्या वेतन निश्चितीबाबत कायद्याची नेमकी भूमिका काय आहे ह्या बाबत आमच्या मनात संभ्रम आहे. त्यामुळे ह्या संदर्भातला निर्णय हा घटनापीठाने म्हणजे Larger Bench ने (जे की ३ जज्जचे असते) द्यावा. ह्या चारही मॅटर्समध्ये दुर्दैवाने अॅड. सुरेश पाकळे हे कोणाचेही वकील नव्हते. न्या. शुक्रे व न्या. सानप यांची ही ऑर्डर मॅनेजमेंट असोसिएशनने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवली आणि मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठातील पॉलीटेक्निकच्या प्राध्यापकांच्या वेतन व वेतनातील फरकाच्या सर्व केसेस Larger Bench चा निकाल जो पर्यंत लागत नाही तो पर्यंत अनिश्चित काळासाठी hold वर गेल्या. अनेक जेष्ठ वकिलांनी हा चुकीचा निकाल झालाय असे मत व्यक्त केले पण त्यामुळे आपल्या टॅफनॅपच्या जवळपास २२ केसेस अडकून पडल्या.
आता न्या. जामदार, न्या. भारती डांगरे व न्या. मारणे यांचे Higher Bench स्थापन झाले आहे. ह्या बेंच समोर आज न्या. शुक्रेंच्या ऑर्डर प्रमाणे कायद्याचा नेमका अर्थ सांगण्यासाठी पहिली सुनावणी होती. ह्या सुनावणीसाठी पुन्हा अॅड. उदय वारूंजीकर प्राध्यापकांची बाजू मांडायला उभे राहीले असते तर त्यांचा पूर्वइतिहास लक्षात घेता आपली बाजू कदाचित नीटपणे मांडली गेली नसती. गुरुवारी मी मुंबईत होतो. ह्या संदर्भात मी पाकळे साहेबांशी चर्चा केली. जो पर्यंत अॅड. उदय वारूंजीकर यांचे No Objection Certificate घेवून आपण पाकळे साहेबांना वकील पत्र देत नाही तो पर्यंत खूप इच्छा असूनही पाकळे साहेब आपली बाजू मांडू शकत नव्हते. मग बारामतीचे एम.एस. पाटील, कुलकर्णी सर व वसईच्या जयस्वाल सर (ह्यांची दोन पिटीशन्स सुनावणीसाठी Larger Bench समोर होती) यांचेशी मी चर्चा केली. वेळ फारच कमी होता. ह्या सगळ्यांनी पाकळेसाहेबांशीही चर्चा केली. काल रविवार असूनही बारामतीच्या एम.एस. पाटील, कुलकर्णी सरनी अॅड. उदय वारूंजीकर यांची पुण्याला जावून NOC घेतली तर जयस्वाल सरनी आज सकाळी १०.०० वाजता अॅड. उदय वारूंजीकर यांची NOC घेतली व त्या दोघांचेही वकीलपत्र पाकळे साहेबाना दिले. अॅड.वारुंजीकरना ह्या दोघांनीही दिलेल्या काही लाख रुपये फीवर त्यांना पाणी सोडावे लागले. अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रा. एम.एस. पाटील, प्रा. कुलकर्णी, प्रा. जयस्वाल, प्रा. भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी संघटनेवर विश्वास ठेवून वकील बदलायचा निर्णय घेतला व त्याची त्वरेने अंमलबजावणी केली ह्या बद्दल त्यांचे आभार व अभिनंदन.
आजच्या सुनावणी मध्ये न्या. जामदार, न्या. भारती डांगरे व न्या. मारणे यांच्या बेंच समोर अॅड. सुरेश पाकळे, अॅड. सौरभ पाकळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाजू मांडायला सुरवात केलेय. आज फक्त प्रा. जयस्वाल यांचे एकच मॅटर सुनावणीसाठी होते. अॅड. सुरेश पाकळे यांनी अशाच प्रकरची टॅफनॅपची जवळपास २२ मॅटर्स पेंडिंग आहेत ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर अशा सर्व Similar matters ना नोटीस issue करा असा कोर्टाने आदेश दिला व पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी ठेवली आहे. ही सुनावणी कदाचित आणखी एक महिना चालेल. पण Larger Bench च्या निर्णयानंतर सध्या जो एक Dead Lock झाला होता तो सुटेल व आपली सर्व मॅटर्स लौकरात लौकर निकालात निघतील अशी आशा आहे. प्रा. एम.एस. पाटील, प्रा. कुलकर्णी, प्रा. जयस्वाल, प्रा. भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाकळे साहेबांना वकील पत्र दिल्यामुळे कदाचित त्याचा फायदा मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठातील पॉलीटेक्निकच्या प्राध्यापकांच्या सर्व Pending केसेसमध्ये होईल.
टॅफनॅपच्या बऱ्याच सदस्यांना ह्या Larger Bench Referral ची नीट माहिती नव्हती म्हणून मी एवढे सविस्तर विवेचन केले आहे. शेवटी “Together, We Can ! “
वैद्य सरांनी त्यांच्या वरील मेसेज मध्ये आमचे आभार मानले हे त्यांचे मोठेपण आहे. वास्तविक आम्हीच वैद्य सरांचे व पाकळे सरांचे अत्यंत आभारी आहोत. तसेच या ठिकाणी मी जादा बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष करून दाखवेल व केल्या वरच आपल्याला सांगेल. एक अतिशय महत्त्वाचा टप्पा पार पडला आता फायनल हिअरींग मध्ये दुसरा महत्त्वाचा टप्पा येणार आहे. तत्पूर्वी वैद्य सरांशी चर्चा करणे गरजेचे आहे. लवकरच मी सरांना वेळ असेल तेव्हा भेटायला जाणार आहे.
ReplyDeleteसर आपल्या व टॅफनॅपच्या सहकार्र्यांच्या दुरदृष्टीने, मार्गदर्शनाने,योग्य नियोजनाने, अनुभवातुन -चुकातुन शिकण्याने…
ReplyDeleteसगळ्यात महत्वाचे कळकळ व निःस्वार्थ त्यागाने योग्य लोकांची जमवाजमव झाली आहे.
हे त्याचे फळ आहे.
तथागत भगवान बुद्ध यांच्या अस्थी तर सापडल्या परंतु सम्राट अशोक यांच्या अस्थी आहे तरी कुठे ?
ReplyDeleteसम्राट अशोक यांच्या अस्थी स्तूपाचे अवशेषच्या संदर्भात आज जगातील सर्व शोधकर्ते सम्राट अशोक यांच्या अस्थि शोधून काढण्यात अयशस्वी राहिलेले आहे. परंतु त्यांच्या अस्थी चे अवशेष कुठे असावे याचे अनुमान आणि निष्कर्ष काढण्यात त्यांना यश आलेले आहे.
हिंदी न्यूज राजस्थान पत्रिका कडून दिनांक 19 ऑगस्ट, 2014 ला एस. आर. वर्मा, उपसंचालक मध्य प्रदेश, राज्य पुरातत्व आणि संग्रहालय यांची एक बातमी प्रकाशित झाली त्यामध्ये म्हटलेले आहे की मध्य प्रदेश च्या शिवपुरी जिल्ह्यातील पीछोरी तालुक्या पासून 30 किलोमीटर च्या अंतरावर एक राजापूर गाव आहे.
या गावांमध्ये एक स्तूप असून या गावचे लोक या स्तूपाला कुटिया मठ नावाने ओळखतात. भारतीय पुरातत्व विभाग यांना 2200 वर्षे इतका जुना स्तूप ग्रामीण भागाचा सर्वे करताना पुरातत्व विभागाच्या टीमला सापडला.
येथे ईसा पूर्व 184 ते 185 हा काळ शुंगकाळ म्हणून ओळखल्या जात आहे. पुरातत्त्व विभागाच्या तज्ञांचे असे मत आहे की यास तुपाच्या खाली एक तांब्याचा कलश असू शकतो की, ज्याच्यामध्ये अशोक सम्राट यांच्या असती असाव्यात.
पुरातत्त्व विभागाच्या तज्ञांनी सखोल निरीक्षण केले. पुरातत्व विभागाच्या टीमने या स्तूपाला सम्राट अशोक यांच्या काळातील काळातील असावा अशी गृहीत धरून पुढे वाटचाल करीत आहे.
मध्य प्रदेशामध्ये बौद्ध स्तूप मोठ्या प्रमाणात भोपाल, विदिशा, देवास,होशंगाबाद यांच्या आसपासच्या प्रदेशांमध्ये सापडलेले आहे. येथेच सांची स्तूप सुद्धा उभारण्यात आलेला आहे. ग्वालियर - चंबल चार क्षेत्रामध्ये बौद्ध स्तूप असल्याचे अद्याप पुरावे मिळालेले नाही.
वर्तमान परिस्थितीत जो स्तूप आहे तो जीर्ण अवस्थेमध्ये आहे. यास स्तूपाच्या शिखराचा भाग पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे. याच्याशिवाय या स्तूपाचे काही भाग खसून पडलेले आहे. पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे की, सम्राट अशोक यांनी आपले शरीर सोडल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी सम्राट अशोकाच्या पार्थिव देहाच्या अस्थीची राख घेऊन निघाले होते.
त्यांच्या जवळील एका तांब्याच्या कलश यामध्ये पार्थिव देहाची राख होती. त्या तांब्याच्या कलशाला येथे आणल्यानंतर त्यांच्या अनुयायांनी तो कलश येथे दाबून ठेवल्यानंतर हा स्तूप बांधण्यात आला असावा. (संदर्भ:सम्राट अशोक और उनका स्वर्णीम प्रबुद्ध भारत, डॉक्टर सत्यजित गौरीशंकर चंद्रिकापुरे, सम्यक प्रकाशन नवी दिल्ली)
प्रा. गंगाधर नाखले
7972722081
12.08.2024
छत्रपती शिवाजी महाराज यांना शूद्र ब्राह्मणवाद्यांनी म्हटले की बुद्धिस्टांनी म्हटले ? याचा धडधडीत पुरावा श्रीविष्णुपुराण या धर्मग्रंथांमध्ये उपलब्ध आहे.
ReplyDeleteछत्रपती शिवाजी महाराज यांचा तत्कालीन ब्राह्मणवाद्यांनी राज्यभिषेक करण्यास विरोध केला होता,कारण तो शूद्र आहे. असे तत्कालीन ब्राह्मणवाद्यांचे मत होते. जर छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मीय होते आणि ते ब्राह्मणांचे रक्षक होते तर मग याच ब्राह्मणवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यास विरोध का केला होता ? असा प्रश्न मी एका व्यक्तीला विचारला.
तो ब्राह्मणवादी विचारसरणीचा समर्थक होता. त्याने मला उत्तर दिले,'हिंदूंनी किंवा ब्राह्मणवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना शूद्र कधीही म्हटलेले नाही त्यांच्या राज्याभिषेकाला विरोधही केलेला नाही. बुद्धिस्ट लोकांनी इतिहासामध्ये घालमेल करून आम्ही शिवाजी महाराजांना शूद्र म्हटले असल्याचा भ्रम निर्माण केला आहे. '
आम्ही लहानपणापासून जो इतिहास शिकलो, तो लिहिला आहे ब्राह्मणांनी आणि शिकवला ही आहे आम्हाला ब्राह्मणांनी. त्याच इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास ब्राह्मणांचा विरोध होता हे आम्ही शिकलो. महाराष्ट्रातील ब्राह्मण त्यांचा राज्याभिषेक करायला तयार नव्हते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी काशीवरून गागाभट या ब्राह्मणाला राज्याभिषेक करण्यासाठी बोलाविले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
आता लोक, ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांना प्रश्न विचारात आहे की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जर हिंदू होते तर मग त्यांच्या राज्य भिषेकाला विरोध का ? येथे ब्राह्मणांची पोलखोल होते. या प्रश्नाचे उत्तर मध्ये ते दोषी असल्याचे आढळतात. हा दोष आपल्यावर येऊ नये म्हणून ते बुद्धिस्टांना बळीचा बकरा बनवत आहे. वास्तविक पाहता गेल्या 1000 वर्षापासून या देशातील दलित ,आदिवासी, एससी, एसटी, ओबीसी यांना लिहिण्या , वाचण्याचा अधिकारच नव्हता. तर ते शिवाजी महाराज यांच्या विरोधात लिखाण कसे करतील? लेखणीवर शंभर टक्के कब्जा ब्राह्मणांचा होता. मग बुद्धिस्ट इतिहासामध्ये घालमेल कसे करतील?
ब्राह्मणवाद्यांनीच सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह सर्वच राजांना शूद्र म्हटले याचा प्रत्यक्ष आणि धडधडीत पुरावा श्री विष्णुपुराण या धर्मग्रंथांमध्ये आहे.
ReplyDeleteया विष्णुपुराणाचे रचयीता म्हणजे लेखक श्री पाराशर ऋषी आहे. हे पाराशर ऋषी म्हणजे महाभारताचे लेखक वेदव्यास यांचे वडील होय. आता मजेशीर गोष्ट पहा याच पाराशर ऋषीचे आजोबा म्हणजे ऋषी वशिष्ठ राम यांचे वडील राजा दशरथ यांचे पुरोहित होते. म्हणजे महाभारत आणि रामायण या दोघांमध्ये किती हजार वर्षाचा फरक आहे हे तुम्हीच शोधा. म्हणजे किती खोटं लिहावं याला काही मर्यादाच नाही.
याच विष्णुपुराणामध्ये, भविष्यमें होने वाले राजावों का वर्णन, भविष्यमें होनेवाले इक्ष्वाकूवंशीय राजावों का वर्णन, मगधवंशका वर्णन, कलियुगी राजावों और कलिधर्मोंका वर्णन तथा राजवंश-वर्णन का उपसंहार हे भाग पृष्ठ क्रमांक 301,307 वर दिलेले आहे ते आपण आवश्यक वाचा.
या विष्णुपुराणांमध्ये म्हटलेले आहे,'नंदवंशाचा नाश झाल्यानंतर म्हणजेच नंदवंशाच्या राजवटीनंतर या देशामध्ये शूद्र जातीचे राजे राज्य करेल" आता इथे एक गोष्ट समजून घ्या. नंदवंशाच्या समाप्तीनंतर या देशाच्या सत्तेवर मौर्यवंशाची सत्ता सुरू झाली होती, आणि या मौर्य वंशाचा पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य होता की जो बुद्धिस्ट होता. त्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा राजा झाला. त्यानंतर बिंदुसार चा मुलगा अशोक याला आपण सम्राट या नावाने ओळखले जाते. ज्याने अखंड भारताची निर्मिती केली हा तोच सम्राट अशोक होय की ज्याने जगभर हातात तलवार न घेता बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला.
ब्राह्मणवाद्यांना खरा तिरस्कार होता बुद्धिस्टांबद्दल होता. सम्राट अशोक हा बुद्धिस्ट राजा होता म्हणूनच इतिहासामध्ये सम्राट अशोक याला ब्राह्मणांनी चांडाल आणि कुरूप म्हटलेल्या आहे. म्हणजे मौर्यवंशानंतर जेवढे राजे झाले त्या सर्वांना या ब्राह्मणवाद्यांनी शूद्र म्हटलेले आहे.
मग ते गौतमी पुत्र सत्कारणी, गार्गी पुत्र शुगर राजे, अभिर राजे, शक राजे, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादीसह हे सर्व राजे मौर्यवंशानंतर झालेले राजे आहे. त्यामुळे हे सर्व राजे ब्राह्मणवाद्यांच्या दृष्टिकोनातून शूद्र आहेत. यावरून चंद्रगुप्त मौर्य याच्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार छत्रपती शाहू महाराज पर्यंत ब्राह्मण वाद्यांच्या दृष्टिकोनातून शूद्र होते आणि आहे हे या विष्णुपुराण धर्मग्रंथावरून सिद्ध होते.
आता तुम्हीच निर्णय करा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज छत्रपती शाहू महाराज यांना शूद्र कोणी ठरविले. विशेष महत्त्वाचे म्हणजे या विष्णुपुराण धर्मग्रंथामध्ये इंग्रजांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. इंग्रज म्हणजेच ब्रिटिश ब्रिटिश म्हणजे ईसाई आणि ईसाई यालाच ब्राह्मणांनी मुंड (गुरुंड) म्हटलेले आहे. गुरूंड चा उल्लेख विष्णुपुराण मध्ये आलेला आहे. मी खात्रीसाठी गीता प्रेस गोरखपुर चे विष्णुपुराण पृष्ठ क्रमांक 301 ते. 307 वाचू शकता.
प्रा गंगाधर नाखले
7972722081