डॉ. सौ. कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालय, दारापूर येथील कर्मचाऱ्यांची पिळवणूक स्वर्गीय दादासाहेब गवई यांनी २००८ साली त्यांच्या जन्मगावी अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन केले. आर्थिक परिस्थिती चांगली नसतांना सुध्दा हळूहळू महाविद्यालयात infrastructure उपलब्ध करून दिले. AICTE, DTE व विद्यापीठ यांची रितसर मान्यता घेण्यात आली. चांगले प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नेमणूक करून, विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान देऊन जगभरात आपला नावाचा ठसा उमटविला. दरवर्षी विद्यार्थी प्रवेश पुर्ण होत असल्यामुळे विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्यात आली. त्यामुळे आणखी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना प्रत्येक महीण्यात वेतन देण्यात येत होते. कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास देण्यात येत नव्हता त्यामुळे महाविद्यालयाचे वातावरण खेळीमेळीचे होते. चांगल्या वातावरणामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव करायला मिळत होता. शिक्षकांशी कधीही भेटून आपल्या अडचणी व कल्पना मांंडता येत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी...